Home Breaking News थरार….घाटात बस पेटली, 21 प्रवाशी सुखरुप

थरार….घाटात बस पेटली, 21 प्रवाशी सुखरुप

1272

शिळोना घाटातील थरार

चालकाचे प्रसंगावधान, प्रवाशी सुखरूप

उमरखेड : पुसद वरून नांदेड ला जाणारी राज्यमार्ग परिवहन विभागाची बस अचानक पेटली. बसमध्ये धूर दिसताच प्रवाशी घाबरलेत,आरडाओरड करायला लागले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने 21 प्रवाशी सुखरुप बाहेर पडले. ही थरारक घटना रविवारी दुपारी घडली.

पुसद वरून नांदेड ला जाणारी बस क्रमांक ( MH-40- AQ- 6170 ) दुपारी उमरखेड जवळील निळोना घाटातून जात असताना अचानक पेटली. बस मध्ये धूर संचारला असता प्रवाशांनी एकच कल्लोळ केला. अनर्थ घडेल या भीतीने सर्वांचीच गाळण उडाली. बस चालक अरुण फुके यांने प्रसंगावधान राखुन बस घाटातच रस्त्याच्या कडेला उभी केली.

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706

बसच्या चालक व वाहकांनी प्रवाश्यांना तत्परतेने बाहेर काढून दूर उभे राहण्यास सांगितले तो पर्यंत आगीचा भडका उडाला. यात जवळी ता. पुसद येथील मंदा दत्ताजी पोटे या विद्यार्थीनीचे नर्सीग काॅलेज चे सर्व दस्तऐवज व महाविद्यालयात शुल्क भरण्यासाठी सोबत घेतलेले 25 हजार रुपये जळून खाक झाले तर भीम राठोड रा.पारवा तांडा ह्या प्रवाशांचे पन्रास हजारची बॅग व धान्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोफाळी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य बघता ठाणेदार राजीव हाके यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही कालावधीतच आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र या घटनेत प्रवाश्यांचे महत्वपूर्ण साहित्य व रोकड खाक झाली.
उमरखेड : बातमीदार