Home Breaking News थरार….तरुणावर चाकूहल्ला आणि पोलीस ठाण्यापर्यंत पाठलाग…!

थरार….तरुणावर चाकूहल्ला आणि पोलीस ठाण्यापर्यंत पाठलाग…!

पोलिसांच्या सातर्कतेने युवकाचा जीव वाचला

वणी: जुन्या वादातून शाब्दिक वाद आणि वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. जखमी तरुण तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचताच मारेकऱ्यांनी पाठलाग करत पुन्हा हल्ला करणार तेवढ्यात पोलिसांच्या सातर्कतेने पुढील अनर्थ टळला. ही घटना वरोरा मार्गावरील सिद्धी विनायक मंगल कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी घडली.

नगर पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत अनिकेत मोगरे (21) याला बँड वादनाचा छंद आहे. आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे तो वरोरा मार्गावरील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात पोहचला. अनिकेत एकटाच असल्याची संधी साधून मारेकरी हरीश रायपुरे रा. दामले फ़ैल हा आपल्या मित्रांसह मंगल कार्यालयात पोहचला.

अनिकेत आणि हरीश यांच्यात जुना वाद सातत्याने उफाळून येत होता. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला अखेर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपीने चाकू काढून अनिकेत च्या पाठीवर घाव घातला. जखमी तरुणाने आपली सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले. तो पर्यन्त जखमी युवकाचे मित्र ठाण्यासमोर जमा झाले होते.

Img 20250103 Wa0009

काही वेळातच मारेकरी सुद्धा ठाण्याच्या प्रांगणात पोहचला. आणि पुन्हा चाकू काढून हमला करणार तेवढ्यात उपस्थित पोलिसांनी सतर्कता बाळगत आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या एका मित्राला सुध्दा ताब्यात घेतले असून आरोपींची संख्या वाढणार असल्याचे दिसत आहे.

वणी: बातमीदार