Home Breaking News दुर्दैवी घटना, बालकाचा नदीत पडून मृत्यू

दुर्दैवी घटना, बालकाचा नदीत पडून मृत्यू

288

कठड्यावर बसणे जीवावर बेतले

वणी: मित्रांसोबत निर्गुडा नदीवरील पुलावरून फेरफटका मारताना कठड्यावर बसताना अचानक तोल गेला आणि 17 वर्षीय बालक नदीत पडला. पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खायला लागला, त्याला वाचविण्यासाठी मित्राने आरडाओरड केली त्याला उपचारार्थ नेताना वाटेतच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सोमवार दि. 25 एप्रिल ला रात्री 8 वाजता घडली.

सागर राजू ठावरी (17) असे मृतक बालकाचे नाव आहे तो शहरातील शास्त्रीनगर परिसरात वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी तो मित्रासमवेत निर्गुडा नदीच्या पुलावर फिरायला गेला होता. गप्पा मारत असताना त्याने पुलाच्या कठड्यावर बसण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याचा तोल गेला आणि नदीपात्रात कोसळला.

Img 20250422 wa0027

मित्रांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांनी धाव घेत त्याला बाहेर काढले व उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याच्या अकाली मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009