● त्या परिचरिकेला ‘शो-कॉज’
● लसीकरणादरम्यान चा प्रकार, पालक संतप्त
वणी: एस.पी.एम. विद्यालयात आरोग्य विभागामार्फत विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू होते. त्यावेळी चक्क परिचारिकेच्या माध्यमातून एका धर्म प्रसाराची पुस्तके विध्यार्थ्यांना वाटण्यात आली. खळबळ माजवणारी ही घटना शुक्रवार दि.7 जानेवारीला उघडकीस आली.

कोविड या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे विद्यालयात लसीकरण सुरू आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी विद्यालयात जावून लसीकरण मोहीम राबवित आहे.
शुक्रवारी येथील एस. पी. एम. विद्यालयात या शाळेच्या मैदानावर लसीकरण करण्यात आले. या दरम्यान लसीकरण करणाऱ्या एका परिचरिकेने विद्यार्थ्यांनी लस घेतल्यानंतर त्यांना एका धर्म प्रसाराची पुस्तके वाटप करणे सुरू केले. ही बाब मुखध्यापकाच्या निदर्शनास येताच त्यांनी ती सर्व पुस्तके ताब्यात घेतली.
पालक प्रशांत भालेराव यांनी घडलेल्या या प्रकाराची तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकरणी उप विभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित शेंडे यांना भ्रमणध्वनी वरून अवगत केले. याबाबत काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार
● परिचरिकेला समज, कारवाई कडे लक्ष ●
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून वरिष्ठांना कळवले आहे. या प्रकरणी त्या परिचरिकेला करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
डॉ. अमित शेंडे
तालुका आरोग्य अधिकारी