● उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
तालुक्यात डेंगू आजाराने चांगलाच कहर केला आहे. डेंगू आजाराने शेकडो रुग्ण बाधित झाले होते. सोनेगाव येथील 17 वर्षीय बालकाचा डेंगू आजाराने नागपूर येथे उपचारा दरम्यान बुधवार दि. 3 नोव्हेंबर ला सायंकाळी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोना चा विळखा कमी होताच तालुक्यात डेंगू ने थैमान घातले आहे. मागील महिन्यापासून शहरातील दवाखाने डेंग्यूच्या रुग्णांनी खचाखच भरले होते. डेंगू सोबतच मोठ्या प्रमाणात व्हायरल तापाचीही साथ सुरू होती.
तालुक्यातील सोनेगाव येथील रोहन बुच्चे हा वणी येथील महाविद्यालयात इय्यता 11 व्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याला डेंगू आजाराने ग्रासले होते, वणी येथे खाजगी दवाखान्यात त्यांचेवर उपचार सुरू होते.
रोहनच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र दि 3 नोव्हेंबर ला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ऐन दिवाळीच्या दिवशी झालेल्या मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहनच्या अकस्मात मृत्यूने सोनेगावात हळहळ व्यक्त होत आहे.
वणी: बातमीदार