Home Breaking News निर्गुडा नदीच्या पुरात इसमाची ‘उडी’

निर्गुडा नदीच्या पुरात इसमाची ‘उडी’

पुलावर ठेवले कपडे व चप्पल 

वणी – मोक्षधामा जवळ असलेल्या निर्गुडा नदीच्या पुलावरून त्याच परिसरात राहणाऱ्या इसमाने नदी काठावर कपडे व चप्पल ठेऊन उडी मारल्याची बाब निदर्शनास आली असून त्याचा शोध सुरू आहे.

मंगळवारी शहरात पावसाने हाहाकार माजविला होता.  सतत चार ते पाच तास पडलेल्या पाण्याने शहरातील काही भागातील घरामध्ये पाणी शिरले होते. दमदार पावसामुळे परिसरातील नाल्या सोबतच निर्गुडा नदी दुथडी भरून वाहत आहे.

शहरातील मोक्षधाम परिसरात या नदीवर छोटा पूल आहे. काही वेळापूर्वीच या पुलावरील पाणी कमी झाले होते. याच परिसरात राहणारा एक इसम पुलावर आला त्याने अंगावरील कपडे व चप्पल पुलावर काढून ठेवली व नदीत उडी घेतली आहे. नदीत उडी मारणारा फयाज अजगर अली असल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांना या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Img 20250103 Wa0009