Home Breaking News पन्नास हजाराची मागणी, पोलीस व तीन महसूल कर्मचारी ACB च्या “जाळ्यात”

पन्नास हजाराची मागणी, पोलीस व तीन महसूल कर्मचारी ACB च्या “जाळ्यात”

रेती वाहतूक करणाऱ्याला लाच मागणे भोवले

रोखठोक | मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर असलेला पोलीस आणि महसुलचे तीन कर्मचारी यांनी पाच महिन्यांपूर्वी रेतीचा ट्रॅक्टर सोडण्यासाठी तडजोडीअंती 50 हजार रुपयांची मागणी केली. लाच लुचपत विभागाने (ACB) पडताळणी केली. रंगेहात पकडण्यासाठी वेळोवेळी सापळा रचला अखेर गुरुवार दि. 16 फेब्रुवारीला त्या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

संजय रामचंद्र खांडेकर (28) हे पोलीस नाईक म्हणून मुकुटबन पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे तर खातेरा साजा चे तलाठी नमो सदाशिव शेंडे (38), रमेश फकीरा राणे (48) तलाठी नेमणुक साजा मुकूटबन व मंडळ अधिकारी बाबुसींग किसन राठोड (53)असे ताब्यातील लोकसेवकाची नावे आहेत.

त्या चारही लोकसेवकांनी आपले कायदेशीर कर्तव्य न बजावता आर्थिक लाभ मिळण्याकरीता लाचेची मागणी केली. ही घटना 23 सप्टेंबर 2022 ची असून तक्रारकर्त्याला वेळोवेळी पैशाची मागणी केली. तडजोडीअंती 50 हजार द्यायचे ठरले मात्र लाचखोर रंगेहात सापडत नव्हते.

Img 20250103 Wa0009

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या सर्व बाबीची विस्तृत पडताळणी केली. आरोपितांना रंगेहात पकडण्यासाठी अनेकदा सापळा रचला मात्र शातीर लाचखोर गवसले नाहीत अखेर ACB ने केलेल्या पडताळणी व लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले या बाबत खात्री पटल्यानंतर त्या चौघांना ताब्यात घेतले. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक ACB अमरावती मारूती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरूण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, अब्दुल वसिम, सचिन भोयर, महेश वाकोडे, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे व संजय कांबळे यांनी केली.
रोखठोक: बातमीदार