● दोघांवर गुन्हा दाखल

● ट्रान्सपोर्ट चालकाचा समावेश
टाटा एस वाहनात डिझेल भरून अवैधरित्या विक्री करीत असलेल्या दोघांवर वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यामध्ये ट्रान्सपोर्ट चालकाचा समावेश आहे.
वणी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे.त्याच बरोबर परिसरात असलेले गौनखनिज वाहतूक करण्याकरिता ट्रक ची आवशकता असते त्यामुळे ट्रान्सपोर्ट कंपन्या परिसरात डेरा टाकून आहे.
एका एका ट्रान्सपोर्ट कँपणीचे शेकडो वाहन दररोज कोळसा वाहतूक करीत असल्याने त्यांना डिझेल ची गरज असते.हेच हेरून परिसरात अनधिकृत डिझेल विकल्या जात आहे.दि 1 नोव्हेंबर ला घुगूस मार्गावर असलेल्या टोल नाक्या जवळ टाटा ४०७ वाहन क्र एम. एच.३४ बी.जी. ६९२९ मध्ये डिझेल भरून विक्री होत असल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी ओमकार पडोळे यांना मिळाली होती.
शंकर किसन जिवतोडे हा डिझेल पंपा बाहेर डिझेल विक्री करत असल्याचे आढळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे नसल्याचे सांगीतले.त्या ठिकाणी जुगबीर पुनीया हे आले त्यांनी सदरचे टँकर गाडी भाड़े तत्वावर घेतली असुन वरोरा येथील डिझेल पंपा वरून डिझेल आणल्याचे सांगितले.
कोणताही परवाना नसतांना डिझेल विक्री केल्या प्रकरणी शंकर किसन जिवतोडे वय ४९ वर्ष चालक रा. नंदुरी जि. चंद्रपुर,जुगबीर भरताराम पुनीया वय ३७ वर्ष धंदा ट्रास्पोर्ट चालक रा. चिखलगाव या दोघांवर गुन्हा नोंद केला असून 6 लाख रुपये किमतीचे वाहन व 1लाख 24 हजार रुपये किमतीचे डिझेल असा एकूण 7 लाख 24 हजारा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ.वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, पुरवठा निरीक्षण ओमकार पडोळे,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुणे यांनी केली.
वणी:बातमीदार