Home Breaking News पर्यटना करिता गेलेल्या इसमाचा नेपाळ मध्ये मृत्यू

पर्यटना करिता गेलेल्या इसमाचा नेपाळ मध्ये मृत्यू

Img 20250910 wa0005

वणी-शहरापासून लगतच असलेल्या गणेशपूर येथील 65 वर्षीय इसम परिवरासह पर्यटना करिता गेले होते. नेपाळ मध्ये शनिवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

Img 20250103 Wa0009

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच नागरिकांनी पर्यटनाला सुरवात केली आहे. खाजगी टूर अँड ट्रॅव्हल कंपन्या नवनवीन टूर आयोजित करीत आहे आणि हौशी नागरिकांचा त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

वणी शहरात असलेल्या एका टूर अँड ट्रॅव्हल कंपनीने नेपाळ चा टूर आयोजित केला होता. या प्रवासात गणेशपूर येथील शेतकरी भास्कर मोहितकर हे आपल्या परिवारासह पर्यटना करिता गेले होते.

शनिवार दि 15 जानेवारी ला नेपाळ ला असतांना रात्री त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ मध्ये त्यांचे शवविच्छेदन झाले असून त्यांच्या गावी पार्थिव आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वणी: बातमीदार