Home Breaking News पुन्हा …राजूर रिंगरोडवर अपघात, युवक जागीच ठार

पुन्हा …राजूर रिंगरोडवर अपघात, युवक जागीच ठार

अस्ताव्यस्त वाहतुकीचा परिणाम

वणी: परिसरात अपघाताचे सत्र सुरू आहे, त्यातच लालपुलिया ते राजूर रिंगरोड अपघातप्रवन क्षेत्र बनले आहे. शनिवार दि. 16 जुलै ला रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान भरधाव ट्रक ने दुचाकीस्वाराला चिरडले. यात 30 वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

विपीन खंडाळकर (30) हा तरुण निंबाळा या गावातील रहिवाशी असून तो महावीर मिनरल्स या कोल वाशरिज मध्ये कामाला होता. आपले कर्तव्य पूर्ण करून तो दुचाकीने आपल्या गावी परत जात असताना राजूर रिंगरोड जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक ने जबर धडक दिली.

अपघात प्रचंड भीषण होता, दुचाकीचा चुराडा झाला असून विपीन चा घटनास्थळीच मृत्यू झाला. घडलेल्या घटनेने स्थानिक चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी काहीकाळ या महामार्गावरील वाहतूक ठप्प पाडली होती. कोणताही अनुचित प्रकार होऊनये याकरिता पोलिसांनी चोख कर्तव्य बजावले.

Img 20250103 Wa0009

घटनास्थळावरील मृतदेह तातडीने उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच बेजबाबदार भरधाव वेगाने जाणाऱ्या व अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वणी: बातमीदार