● पाटाळा पुलाजवळ घडली घटना
रोखठोक | दुचाकीस्वार कामानिमित्त वरोरा येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. 9 जानेवारीला दुपारी घडली.

संजय पिंपळकर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो येथील जैन ले आऊट परिसरातील निवासी होता. तो आपली दुचाकी क्रमांक MH 29 B 1810 ने वरोरा येथे जात होता. तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस क्रमांक MH07 C9375 वणी कडे येत होती.
पाटाळा पुलाजवळ नवीनतम बांधकाम सुरू असल्याने वाहतूक एकमार्गी करण्यात आली आहे. या मार्गावरून मोठया प्रमाणात रहदारी असते. तसेच या मार्गावर अपघाताची शृंखला सुद्धा वाढली आहे. भरधाव वाहने हाकने जीवावर बेतत असून निष्पाप बळी जात आहेत.
वणी : बातमीदार