Home Breaking News भीषण….अपघातात तरुण घटनास्थळीच ठार

भीषण….अपघातात तरुण घटनास्थळीच ठार

2940

अज्ञात वाहनाने दिली दुचाकीला धडक

वणी: ब्राम्हणी येथील 22 वर्षीय तरुण आपल्या दुचाकीने गावी परतत असताना भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला . ही घटना गुरुवार दि.9 जूनला सकाळी 8:30 वाजता घडली. संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह उचलण्यास मनाई केली असून तो मार्ग बंद केला आहे. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Img 20250422 wa0027

आकाश अनिल डाखरे (22) असे दुर्दैवी मृतक दुचाकीस्वारांचे नाव आहे. तो ब्राम्हणी येथील निवासी आहे. शुक्रवारी सकाळी घरगुती कामा निमित्ताने वणी ला गेला होता. काम आटोपून घरी परतत असताना ब्राह्मणी मार्गावरील इंदिरा जिनिंगसमोर अज्ञात वाहनाने दुचाकी (MH-29- BH-1608) ला जबर धडक दिली. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

Img 20250103 Wa0009

घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. प्रत्यक्षदर्शींनी घटनेबाबत पोलिसांना कळवले. होतकरु तरुणांच्या दुःखद मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
वणी: बातमीदार