Home Breaking News भीषण…. उभ्या ट्रकला दुचाकी भिडली, एक ठार दुसरा गंभीर जखमी

भीषण…. उभ्या ट्रकला दुचाकी भिडली, एक ठार दुसरा गंभीर जखमी

नवरगाव जवळ घडली घटना

रोखठोक | बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. भरधाव दुचाकीस्वार उभ्या ट्रकवर आदळले. या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कायर मार्गावर सोमवार दि. 27 फेब्रुवारीला रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली.

अजय बंडू खेरे (23) असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे तर प्रशांत विठ्ठल टिकले (25) हा तरुण गंभीर जखमी असून त्याला उपचारार्थ चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोघेही पळसोनी येथील निवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कायर मार्गावर नवरगाव शिवारात MH-40-Y-1037 हा ट्रक उभा होता. मुकुटबन वरून दुचाकी क्रमांक MH-34-G-4049 वरून दोघे तरुण आपल्या पळसोनी या गावी परतत होते. घरी परतण्याची घाई यामुळे ते भरधाव दुचाकी हाकत असताना त्यांना रस्त्यावरील उभा ट्रक दिसलाच नाही आणि ते ट्रकवर आदळले.

Img 20250103 Wa0009

या भीषण अपघात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटना घडताच बघ्याची प्रचंड गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
वणी: बातमीदार