Home Breaking News भीषण…ट्रक ची दुचाकीला धडक, शिक्षक जागीच ठार

भीषण…ट्रक ची दुचाकीला धडक, शिक्षक जागीच ठार

वणी : येथील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेले 35 वर्षीय शिक्षक कर्तव्यावर जात असताना भरधाव ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 31 मार्चला सकाळी 7 वाजताचे सुमारास घडली.

Img 20250103 Wa0009

प्रशांत बुरांडे (35) असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. ते कुरई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळ पाळी शाळा असल्याने ते व दुसरे शिक्षक श्रीकांत उपाध्ये दुचाकीने शाळेत जाण्यासाठी निघाले होते. प्रशांत दुचाकीच्या मागे बसले होते विशेष म्हणजे दोघेही शिक्षक हेल्मेट घालून होते.

चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आल्याने त्यांनी ब्रेक मारला आणि मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यामध्ये प्रशांत बुरांडे हे जागीच ठार झाले तर दुसरे शिक्षक श्रीकांत उपाध्ये हे जखमी झाले आहे.
वणी: बातमीदार