Home Breaking News मंगळवारी जिल्ह्यात 34 नवीन कोरोना “पॉझिटिव्ह”

मंगळवारी जिल्ह्यात 34 नवीन कोरोना “पॉझिटिव्ह”

13 महिला व 21 पुरुषांचा समावेश
11 व्यक्ती कोरोनामुक्त
नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

यवतमाळ : नव वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या आठवड्यात सातत्याने कोरोना बाधित आढळलेले असताना जिल्ह्यातील नागरिक मात्र बिनधास्त वावरताहेत. मंगळवार दि.11 जानेवारीला प्राप्त अहवालात जिल्ह्यात 34 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात कोरोनाचा “ग्राफ” वाढत असतानाच जिल्हा तसेच तालुक्यात कोरोना बाधित निष्पन्न होताहेत. जिल्ह्यात 34 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 252 व बाहेर जिल्ह्यात 19 अशी एकूण 271 झाली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1291 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 34 अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित 1257 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73284 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71225 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.

Img 20250103 Wa0009

आज पॉझिटिव्ह आलेल्या 34 रूग्णांमध्ये 13 महिला व 21 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात 2, दिग्रस 3, मारेगाव 1, नेर 1, पांढरकवडा 1, पुसद 2, वणी 1, यवतमाळ येथील 22 व इतर जिल्ह्यातील एका रूग्णांचा समावेश आहे.
वणी: बातमीदार