Home Breaking News महागाई, बेरोजगारी व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर माकप ‘आक्रमक’

महागाई, बेरोजगारी व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर माकप ‘आक्रमक’

250

वणीत मंगळवारी आंदोलन

वणी : महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. त्या अंतर्गत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्या समोर मंगळवार दि. 31 मे ला निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे तरी नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Img 20250422 wa0027

सतत नवनवे उच्चांक गाठत असलेल्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोट्यावधी लोक दारिद्र्यात ढकलले जात असून त्यांची उपासमारीने तडफड होऊ लागली आहे. बेरोजगारीने कळस गाठला असताना गरिबांना दैन्याच्या खाईत ढकलले जात आहे.

Img 20250103 Wa0009

वर्षभरात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती 70 टक्के, भाजीपाल्याच्या 20 टक्के, स्वयंपाकाच्या तेलाच्या 23 टक्के, डाळीच्या 8 टक्के वाढल्या आहेत. भारतीयांच्या दैनंदिन आहारात आवश्यक असलेला गहू 14 टक्क्यांनी महाग झाला आहे. या सर्व पदार्थांचे दर सामान्य माणसांना परवडण्याच्या पलिकडे गेले आहेत.

केंद्र सरकारने सर्व पेट्रोलियम पदार्थांवरील सेस आणि सरचार्ज कमी करून विशेषतः स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेतली पाहिजे, अशी मागणी डावे पक्ष करत आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून गहू पूर्ववत मिळाला पाहिजे. या दरवाढीला आळा घालण्यासाठी रेशन व्यवस्था मजबूत करावी अशा अनेक मागण्या करण्यात येत आहे.

जनहितार्थ नानाविध मागण्यांना घेऊन करीत असलेल्या माकपचे आंदोलनात जनतेनी सहभागी होऊन सरकारला ह्या मागण्या पूर्ण करण्यास बाध्य करावे असे आवाहन माकपचे शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप परचाके, कवडू चांदेकर, गजानन ताकसांडे, सुधाकर सोनटक्के, किसन मोहूरले, खुशाल सोयाम, रामभाऊ जिड्डेवार, ऋषि कुळमेथे, मनोज काळे, शंकर गाऊत्रे आदींनी केले आहे.
वणी: बातमीदार