Home Breaking News मारेगाव येथे महाआरोग्य शिबीर

मारेगाव येथे महाआरोग्य शिबीर

359

औचित्य डॉ लोढा यांच्या वाढदिवसाचे

रोखठोक |:– येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ तथा समाजसेवक डॉ.महेंद्र लोढा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दि.16 फेब्रुवारी ला महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मारेगाव येथील नगरपंचायतच्या प्रांगणात तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांवर उपचार करणार आहेत.

Img 20250422 wa0027

आयोजित शिबिराचे उद्घाटन खा.बाळू धानोरकर करणार आहेत. माजी आमदार वामनराव कासावार अध्यक्षस्थानी असतील. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, वसंतराव आसुटकर, मारोती गौरकार, मुन्ना कुरेशी, यादवराव काळे, शंकरराव मडावी आदींची मंचावर उपस्थित असणार आहे.

Img 20250103 Wa0009

मोफत असलेल्या शिबिरात सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी, मोफत औषधी, रक्त तपासणी तथा गरज भासल्यास ईसीजी, एक्सरे, 2 डी इको केल्या जाईल. यासह मोतीबिंदू शस्रक्रिया, दुर्बीण द्वारे कुटुंब नियोजन शस्रक्रिया, हायड्रोसील व स्तनावरील गाठीवर मोफत शस्रक्रिया करण्यात येणार आहे.

शिबिरात नामवंत हृदय रोगतज्ञ डॉ.रोहन आईचवार, डॉ.संदीप धुत, मेंदू रोग तज्ञ डॉ.कपिल गेडाम, पोट विकार तज्ञ डॉ.शशांक वंजारी, मूत्र रोगतज्ञ डॉ.पंकज जावंदिया, डॉ. रौनक कोठारी यांचेसह प्रसूती, स्त्री रोग, बाल रोग, दंत, नेत्र, जनरल फिजिशीयन, अस्थी रोग, फिजिओथेरेपी विभागाचे तज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत.

तालुक्यातील रुग्णांनी या शिबिरात उपचार करून प्रकृती ठणठणीत करावी असे आवाहन अंकुश माफुर, गणुजी थेरे, विजय बोथले, रवी धानोरकर,अशोक धोबे, तुळशीराम कुमरे, दयानंद कुडमेथे, गोपाल खामनकार , समीर सय्यद, मारोती सोमलकर, राजू पचाभाई, प्रफुल्ल विखनकर, रवी पोटे यांचेसह मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार