Home Breaking News धक्कादायक…युवतीची ओढणीने गळफास लावून आत्महत्या..!

धक्कादायक…युवतीची ओढणीने गळफास लावून आत्महत्या..!

1393

रविवारी सकाळी उघडकीस आली घटना

नेर: शहरातील तेलीपूरा परिसरात वास्तव्यास असलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या घरातच ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. तिने आपली जीवनयात्रा का व कशामुळे संपवली याबाबत चे नेमके कारण पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे.

Img 20250422 wa0027

श्रध्दा भाष्कर हिवरकर (20) असे मृतक युवतीचे नाव असून ती एका महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिकत आहे. तिचे आई- वडील शनिवारी आपल्या मूळगावी गेले होते. ते नेर ला व्यवसानिमित्त भाड्याच्या घरात राहत होते.

Img 20250103 Wa0009

घटनेच्या दिवशी रात्री ‘ती’ एकटीच घरी होती, तिने रात्रीच्या सुमारास ओढणीच्या साहयाने गळफास लावला आणि आपली जीवनयात्रा संपवली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान लहान मुलांनी खेळता खेळता दरवाज्याला धक्का मारला असता सदर प्रकार उघडीस आला.

या प्रकरणा बाबत तिच्या आई-वडिलांना कळविण्यात आले आणि पोलिसांना सूचना देण्यात आली. फिर्याद दाखल करताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवले. तिने आत्महत्या का केली हे अस्पष्ट असून पोलीस तपासाअंती नेमके कारण उघड होणार आहे
नेर: बातमीदार