Home Breaking News “राजू” विदर्भ वीरच नाही तर विदर्भाचा सिंह…!

“राजू” विदर्भ वीरच नाही तर विदर्भाचा सिंह…!

439

मनसे नेते प्रकाश महाजन यांचे वक्तव्य

सुनील पाटील | जांबुवंतराव धोटे नंतर जर कोणी विदर्भवीर असेल तर राजू उंबरकर आहे. राजू, विदर्भ वीरच नाही तर विदर्भाचा सिंह आहे. असे भारदस्त वक्तव्य मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केले ते येथे आयोजित शेतकरी मेळावा व बियाणे वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.

Img 20250521 wa0020

अतिवृष्टीमुळे खरिपातील पारंपरिक पिकं गमावलेल्या शेतकऱ्याला रब्बी हंगामात उभं राहता यावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी महत्वाकांक्षी उपक्रम अमलात आणत तब्बल पंधराशे शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले.

Img 20250103 Wa0009

यानिमित्ताने आयोजित मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून महाजन बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, विदर्भात कोणत्याही पक्षात राजू उंबरकर सारखा खंबीर नेता नाही. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजू उंबरकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडणार व विजयी सभेत मी स्वतः मार्गदर्शन करणार असल्याचे स्पष्ट केले.

तुम्हाला चीड कशी येत नाही
शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना राजू उंबरकर कमालीचे भावुक झाले होते. सत्ता नसताना मनसेच्या माध्यमातून महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येतो आणि सत्ताधारी व सत्ता उपभोगून गलेलठ्ठ झालेले नेते, पुढारी शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेत नाहीत याची खंत व्यक्त करत उंबरकर कमालीचे संतापले. तुम्हाला चीड कशी येत नाही असा उलट सवाल उपस्थित करत मतदानातून व्यक्त व्हा असे आवाहन करण्यात आले.

मनसेची कन्यादान योजना
सातत्याने सर्वसमावेशक उपक्रम राबविण्यात हातखंडा असलेल्या राजू उंबरकर यांनी अस्मानी व सुलतानी संकटाने डबघाईला आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या माता- भगिनीला धीर देण्यासाठी कन्यादान योजनेची घोषणा केली. शर्मीलावहिनी ठाकरे अल्पभूधारक शेतकरी कन्यादान योजना वणी उपविभागात राबविण्यात येणार आहे. गरीब शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नापासून तिच्या पहिल्या बाळंतपणाची जबाबदारी महाराष्ट्र नवनर्माण सेना उचलणार आहे.

आयोजित मेळाव्यात व्यासपीठावर दिलीप बापु धोत्रे, आनंद ऐम्बडवार, संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटिल, जिल्हा व्यवस्थापक महाबीज अशोक ठाकरे, कृषिमित्र डॉ.दिलिप अलोने, नागपूर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुतकर, यवतमाळ महिला जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांच्यासह नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.
वणी : बातमीदार