Home Breaking News राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 694 प्रकरणाचा निपटारा

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 694 प्रकरणाचा निपटारा

212
1 कोटी 2 लाखाचा दंड वसूल

वणी:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांचे निर्देशानुसार वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 25 सप्टेंबर 2021 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, वणी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

या लोक अदालतीत दोन पॅनल मंडळ ठेवण्यात आली होती. पहिल्या पॅनलमध्ये पॅनल प्रमुख म्हणून के. के. चाफले, दिवाणी न्यायाधीश, व सदस्य म्हणून ऍड सिडाम व ऍड कुलकर्णी होत्या. तसेच दुस-या पॅनलमध्ये पॅनल प्रमुख म्हणुन  एस. एम. बोमीडवार, सह- दिवाणी न्यायाधीश, व सदस्य म्हणून ऍड मांडवकर, ऍड बोरुले होते. त्यासह विशेष न्यायालय म्हणून पी.सी. बछले, सह-दिवाणी न्यायाधीश यांनी कामकाज बघितले.

Img 20250103 Wa0009
C1 20250418 20491706

सदरहु लोकन्यायालयात एकुण 166 दिवाणी व फौजदारी दाखल प्रकरणे समझौत्याने मिटली व त्यामध्ये एकुण रक्कम 54 लाख 94 हजार 525 रुपये एवढया रकमेची तडजोड झाली. त्यासह सदरहु लोकअदालतमध्ये बँकेचे, ग्रामपंचायत व एम. एस. सी. बी. व इतर असे एकुण 495 दाखल पूर्व प्रकरणे निकाली निघाली व त्यामध्ये एकुण रक्कम 47 लाख 19 हजार 68 रुपये वसुल झाली. विशेष न्यायालयाने एकुण 33 दाखल प्रकरणे निकाली काढली असुन एकुण रक्कम 33 हजार रुपये दंड वसुल झाला.

लोकअदातच्या संदर्भाने वणी येथील न्यायालयात दिनांक 22 ते 24 सप्टेंबर पर्यंत विशेष मोहिमे अंतर्गत एकुण 378 दाखल फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदरहु लोकअदालत व विशेष न्यायालय व विशेष मोहिम यशस्वी होण्यास सहा. अधिक्षक जाधव, खोंडे व देशमुख यांचेसह तालुका विधी सेवा समितीचे वरीष्ठ लिपीक जुमनाके, कनिष्ठ लिपीक निमकर व शिपाई महेश इतर न्यायालयीन कर्मचा-यांनी उत्सफुर्त सहभाग होता. त्यासह वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड कावडे, पीआय श्याम सोनटक्के, एपीआय मुकुंद कवाडे, सपोनि सचिन लुले, राजू बागेश्वर, अशोक स्वामी, सुनील कुंटावार, संदीप मंडाले, अशोक टेकाडे, चालक सदाशिव माथनकर, यांनी  व इतर मान्यवर वकीलांनी मोलाचे सहकार्य केले व लोकअदालत यशस्वी होण्यास सहभाग दिला.