Home Breaking News रोहित पवार यांच्या हस्ते ‘शुभम’ ला कृषीथॉन पुरस्कार

रोहित पवार यांच्या हस्ते ‘शुभम’ ला कृषीथॉन पुरस्कार

नाशिक येथे पार पडला सोहळा

रोखठोक | युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषीशिक्षण घेणाऱ्या व या क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. याप्रसंगी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते येथील शुभम रमेश पिंपळकर यास कृषीथॉन पुरस्काराने गौरविण्यात आले.

कृषिक्षेत्रात शिक्षण घेत असताना कृषिविस्तार, कृषिसंधाना बरोबर सामाजिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी ‘कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त विद्यार्थी

मराठवाडा असो की पश्चिम महाराष्ट्र या तुलनेत आपल्या विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात शेती तंत्रज्ञानाचा वापर होत नाही. विदेशात मनुष्यबळ कमी असल्यामुळे रोबोटिक शेतीचा अवलंब करण्यात येत असून स्पेस फार्मिंग, टेरेस फार्मिंग, माती विना शेती अशा नवनवीन शेती पद्धती चा अवलंब मोठ्या प्रमाणात विदेशात करण्यात येत आहे. हे नवनवीन तंत्रज्ञान आपल्या विभागात कशाप्रकारे आणता येईल याकरिता कायम प्रयत्नशील राहील.
शुभम पिंपळकर
वणी

Img 20250103 Wa0009

कृषीक्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतीविषयक नवीन संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कृषीपदवीधरांची भूमिका लाखमोलाची ठरणार आहे. अशा उपक्रमातून त्यांना प्रेरणा मिळावी कृषी विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची मानसिकता तयार करण्याचे काम करत असताना कृषीक्षेत्रात आदर्शवत कार्य व्हावे हा यामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
वणी : बातमीदार