Home Breaking News लग्नपत्रिका वाटणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती ‘मृत्यू’

लग्नपत्रिका वाटणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती ‘मृत्यू’

 वन्यप्राण्यांची दुचाकीला धडक

वणी: आश्रम शाळेत कामाठी पदावर कार्यरत कर्मचारी मुलीच्या लग्नाची पत्रिका नातेवाईकांना पोहचावी याकरिता दुचाकीने जात होते. शुक्रवार दि. 17 जूनला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान पांढरकवडा येथे जाताना वाटेत वन्यप्राणी ( रोही ) दुचाकीला धडकला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

शांताराम हिरामण तलांडे (58) हे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचार्यांचे नाव असून ते खडकडोह येथील निवासी आहेत. त्यांच्या मुलीचे 8 जुलै ला लग्न होते याकरिता ते लग्नपत्रिका नातेवाईकांना वेळेपूर्वी पोहचविणाऱ्यांसाठी धावपळ करत होते. मात्र ‘काळ’ समोर उभा ठाकला होता.

घटनेच्या दिवशी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान ते पांढरकवडा येथे जात असतांना वन्यप्राणी रोह्याचा कळप आडवा आला. यावेळी अकस्मात रोही दुचाकीवर धडकला, अपघात भीषण असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची कल्पना मुकुटबन पोलिसांना देण्यात आली. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले.

Img 20250103 Wa0009

मृतक शांताराम हिरामण तलांडे हे शासकीय आश्रम शाळा बोथ 72 (पांढरकवडा) येथे कामाठी या पदावर कार्यरत होते. त्यांच्या मुलीचे पुढल्या महिन्यात लग्न असल्याने लग्न पत्रिका वाटत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
वणी: बातमीदार