वणी: वणी लायन्स क्लब च्या अध्यक्षपदी मंजिरी दामले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवार दि 28 ऑगस्ट ला लायन्स स्कूल वणी सभागृहात झालेल्या सभारंभात त्यांना पदभार देण्यात आला.

यावेळी एम. जे. एफ. माजी प्रांतपाल शैलेश बागला, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, अंजना गोयल, सोहन गोयल, तसेच ललीता एस. बोदकुरवार व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सुधीर दामले यांनी शैलेश बागला यांचे परिचय वाचन केले.
दिप प्रज्वलनानंतर लायन्स स्कुल च्या विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागत गिताने पाहुण्यांचे स्वागत केले. शैलेश बागला यांनी मंजीरी सुधीर दामले यांना अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष दुर्दाना शमीम अहमद, सेक्रेटरी सुनिता बलदेव खुंगर, ट्रेझरर चंद्रकांत जोबनपुत्रा, मेंबरशिप चेअर पर्सन नरेंद्र नगरवाला, टॅमर लायन दत्तात्रय चकोर, टेल व्टिस्ट डॉ. के. आर. लाल व डायरेक्टर्स प्रमोद देशमूख, डॉ. रविकांत देशपांडे, रमेश बोहरा, शांतीलाल बी. पांडे यांची निवड करून पद व जबाबदारीची शपथ दिली.
कार्यक्रमा दरम्यान माजी प्रांतपाल शैलेश बागला यांनी, शमीम अहेमद, डीस्ट्रीक्ट को-ऑर्डीनेटर स्कूल एज्युकेशन यांचा विशेष गौरव करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच वणी क्लबचे चॅटर्ड मेंबर दत्तात्रय चकोर व प्रमोद देशमुख यांचा सत्कार केला.
शैलेश बागला यांनी लायन्स क्लब, वणी व्दारा संचालीत लायन्स इंग्लिश मिडी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांचे व पर्यायाने देशाचे भाग्य घडविण्याचे कार्य करीत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्याचा आणखी कार्य विस्तार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रमुख अतिथी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, अंजना गोयल यांनी मार्गदर्शन केले तर ललीता बोदकुरवार व नवनिर्वाचीत अध्यक्ष मंजीरी दामले यांनी मनोगत व्यक्त केले.
पदग्रहण समारंभाचे ध्वजवंदना वाचन चंद्रकांत जोबनपुत्रा यांनी केले. तर महेंद्र श्रीवास्तव यांनी आभार प्रदर्शन केले. संचालन सोनाली काळे व कु. पायल सिंग यांनी केले. या वेळी लायन राजाभाउ पाथ्रडकर, लायन बलदेव खुंगर, तसेच मान्यवर व शिक्षक उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
वणी: बातमीदार