Home Breaking News वणीतील मनसेचे चार कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

वणीतील मनसेचे चार कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

रुग्णसेवा केंद्रातून केली अटक

वणी: शहरात कोणताही अनुचित प्रकार घडूनये याकरिता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांना रात्रीपासून नजरकैदेत ठेवले असून दि. 4 मे ला रुग्णसेवा केंद्रातून मनसेच्या चार प्रमुख कार्यकर्त्यांना दुपारी 12: 30 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माजी नगरसेवक धनंजय त्रिबके, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे व रोशन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. विदर्भातील मनसेचा गड असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र सैनिक सदैव आक्रमक ‘मोड’ मध्ये असतात. यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी कारवाई केली आहे.

वणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात पदाधिकाऱ्यांना कलम 149 ची नोटीस बजावली होती. यात राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, माजी नगरसेवक धनंजय त्रिंबके,तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांचेसह अन्य तीन पफधिकाऱ्यांचा समावेश होता.

Img 20250103 Wa0009

औरंगाबाद येथील सभे दरम्यान पोलीस प्रशासनाने राज ठाकरे यांना घालून दिलेल्या 16 अटी पैकी 12 अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच या प्रकरणी त्यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे महाराष्ट्र सैनिकांत अस्वस्थता पसरली आहे. राज्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाला 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिल्याने वातावरण तापलं आहे.
वणी: बातमीदार