Home Breaking News वणी – गणेशपूर चा संपर्क तुटला, पुलावरून पाणी

वणी – गणेशपूर चा संपर्क तुटला, पुलावरून पाणी

दोन्हीकडील वाहतूक खोळंबली

वणी: शहरालगत असलेली निर्गुडा नदी दुथडी भरून वाहत आहे. वणी शहराला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्हीकडील वाहतूक खोळंबली आहे. तर तहसीलदार यांचेसह महसूल प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

शहरात तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पाण्याचा योग्यप्रकारे निचरा व्हावा याकरिता पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सोमवार रात्री पासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. परिसरातील नाले दुथडीभरून वाहताहेत, नांदेपेरा मार्गावरील गुंजे चा नाला दुथडीभरून वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

Img 20250103 Wa0009

परिसरात सतत बरसत असलेल्‍या पावसाने तालुक्‍यातील काही रस्‍ते खरडुन गेले आहे. काही ठिकाणावरील पुल वाहुन गेल्‍याच्‍या घटना समारे आल्‍या आहे. परंतु अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. शहरालगत असलेल्या निर्गुडा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गणेशपूर- वणी चा संपर्क तुटला आहे. घटनास्थळी तहसीलदार निखिल धुळधर उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
वणी: बातमीदार