Home Breaking News वाघाच्या हल्ल्यात परप्रांतीय मजूर जखमी

वाघाच्या हल्ल्यात परप्रांतीय मजूर जखमी

ब्राम्हणी येथील घटना

रोखठोक | तालुक्यात वाघाचा संचार सुरू आहे. परिसरात सातत्याने वाघ्रदर्शन होताहेत. अशातच शहरापासून जवळच असलेल्या ब्राह्मणी येथे टॉवरवर काम करणाऱ्या 35 वर्षीय मजुरावर वाघाने झडप घातली. या हल्ल्यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे 4 वाजता घडली.

तालुक्यात सध्या वाघाची चर्चा जोरदार सुरू आहे. कुठे ना कुठे वाघाचे दर्शन नागरिकांना होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील मनीष नगर परिसरात वाघ आल्याचे नागरिकांनी बघितले होते.

तालुक्यात वाघांचा वाढता वावर आता डोकेदुखी ठरत आहे. आठवड्याभरा पूर्वी भुरकी येथील 25 वर्षीय युवकाला वाघाने ठार केले होते. तर गुरुवार दि. 24 ,नोव्हेंबरला पहाटे 4 वाजताचे सुमारास लगतच असलेल्या ब्राह्मणी गावात टॉवर चे काम करणाऱ्या बिहार येथील मजूर उमेश पासवान (35) याच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले आहे.

Img 20250103 Wa0009

वाघाने हल्ला चढवताच अन्य मजुरांनी आरडाओरड केल्याने वाघाने धूम ठोकली. मात्र मजुराच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून त्याचे वर डॉ. महेंद्र लोढा यांचे कडे उपचार सुरू आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्याने आता वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
वणी: बातमीदार

Previous articleविष प्राशन करणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू
Next articleमनसेचा दणका, पालिका लागली कामाला
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.