Home Breaking News वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

818

राजूर फाट्या जवळ अपघात

आपले काम आटवून दुचाकीने आपल्या गावाकडे जात असलेल्या 50 वर्षीय इसमाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात वाहन फरार झाले आहे.

Img 20250422 wa0027

मोहन नानाजी जांभुळकर (50) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.ते मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी आहे.ते पाटाळा येथे खाजगी कामावर होते.नेहमी ते दुचाकीने जाणे येणे करीत होते.

Img 20250103 Wa0009

दि 10 डिसेंबर ला नेहमी प्रमाणे आपले काम आटवून दुचाकी क्रमांक MH 29 AP2164 ने गावाकडे जाण्यासाठी निघाले असता रात्री 8 वाजताचे सुमारास राजूर फाट्या जवळ असलेल्या वळणावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात होताच अज्ञात वाहन घटनास्थळा वरून पसार झाले आहे.
वणी:बातमीदार