Home Breaking News विकास तीर्थ बाईक रॅलीने शहर दणाणले

विकास तीर्थ बाईक रॅलीने शहर दणाणले

 भाजपा सरकारच्या यशस्वी अष्टवर्ष पूर्तीचे

वणी: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारच्या यशस्वी कारकीर्दीचे आठ वर्षे पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा वणी तालुक्याच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवार दि. 13 जूनला करण्यात आले होते. याप्रसंगी वरिष्ठ नेत्यांचा जयघोष करत शहरातून मार्गक्रमण करण्यात आले.

भाजपा सरकारच्या यशस्वी ८ वर्षपूर्ती निमित्ताने भाजपा युवा मोर्चा तर्फे ‘विकास तीर्थ बाईक रॅली’ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती.

विकास तीर्थ बाईक रॅलीचा शुभारंभ आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तथा जिल्हा सरचिटणीस रवि बेलुरकर, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा विवेक बोडे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, तालुका सरचिटणीस शंकर बांदुरकर, शहर चिटणीस राकेश बुग्गेवार यांच्या हस्ते बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

Img 20250103 Wa0009

यावेळी युवामोर्चचे जिल्हा सरचिटणीस नितिन वासेकर, संदिप बेसरकर, दिपक पाऊनकर, वैभव कवरासे, युवमोर्चा शहर अध्यक्ष अवि आवारी, तालुका अध्यक्ष शुभम गोरे, आशिष डंभारे, पंकज कासावार, शुभम इंगळे, अक्षय देठे, रोशन मोहितकर, अवि सोनूले, स्वप्नील बोंडे, सुमित चौधरी, मयूर शेंडे, निखिल ठेंगणे यांचेसह युवा मोर्चाचे व भाजपाचे पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होते.
वणी: बातमीदार