वणी: ‘मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयावर आधारीत तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सवाचे आयोजन येथील शिक्षण प्रसारक मंडळ, विदयालयात दि. 25 ऑगस्ट ला करण्यात आले होते. यात लायन्स हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी व्दितीय पारितोषीक पटकाविले.
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वणीच्या वतीने ‘मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयावर आधारीत तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात तालुक्यातून एकुण 7 माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता.
लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कुल च्या विदयार्थ्यांनी लसीकरणाची कथा या उपविषयावर 30 मिनिटांचे नाटय सादर केले होते. मुख्याध्यापक प्रशांत गोडे, शिक्षिका सिमा पांडे व रश्मी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यात अनिकेत तुराणकर, आर्या महाकुलकर, धनश्री एकरे, रोशन माथनकर, सक्षम मोहुर्ले, वेदी कोनप्रतिवार, अनुष्का बुजाडे, आयुष पाचभाई या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
झरीचे पं.स.चे गट शिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, शि.प्र.मं. विदयालयाचे उपमुख्याध्यापक रमेश तामगाडगे, प्राचार्य प्रशांत गोडे, परिक्षक अभय पारखी, डॉ. प्रा. परेश पटेल यांचे हस्ते विदयार्थ्यांना गौरवीण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष शमीम अहमद, उपाध्यक्ष डॉ. के. आर. लाल, सचिव महेंद्र श्रीवास्तव, कोषाध्यक्ष रमेश बोहरा, संचालक डॉ. आर. डी. देशपांडे, सुधीर दामले, सी. के. जोबनपुत्रा, बलदेव खुंगर, ललिता बोदकुरवार, प्राचार्य प्रशांत गोडे व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले.
वणी: बातमीदार





