Home Breaking News विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर डॉ. डाखरे

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर डॉ. डाखरे

मारेगाव | गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने विविध प्राधिकरणाकरिता नुकत्याच निवडणुका पार पडल्यात. यामध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत तालुक्यातील मांगरूळ येथील रहिवासी प्रा. डॉ. संतोष डाखरे हे बहुमताने विजयी झालेत.

डॉ.संतोष डाखरे हे स्तंभलेखक तथा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून परिचित असून विविध वृत्तपत्रातून ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयावर सातत्याने लिखाण करीत असतात. मागील वर्षी त्यांचे कोरोना कालावधीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करणारे लक्षवेध नामक पुस्तक महान समाजसेवी दांपत्य डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाताई आमटे यांच्याहस्ते प्रकाशित झाले होते.

डॉ. संतोष डाखरे यांनी त्यांच्या विजयामध्ये सहभागी सर्वांचे आभार मानले असून पुढील पाच वर्ष अभ्यास मंडळाच्या माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमाची रचना करुन राज्यशास्त्र विषयाला नवा आयाम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Img 20250103 Wa0009

डॉ. डाखरे हे गडचिरोली जिल्यातील राजे विश्वेश्वरराव कला- वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत.
मारेगाव: बातमीदार