Home Breaking News वृद्धावर रानडुकराचा हल्ला, गंभीर जखमी

वृद्धावर रानडुकराचा हल्ला, गंभीर जखमी

Img 20250910 wa0005

 कुंड्रा शिवारातील घटना

वणी: तालुक्यातील कुंड्रा शिवारात बकऱ्या चराई साठी घेऊन गेलेल्या 60 वर्षीय वृद्धावर अचानक रानडुकराने हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले असून ही घटना रविवार दि. 3 जुलै ला दुपारी घडली.

Img 20250103 Wa0009

मारोती दादाजी आडे (60) हे कुंड्रा या गावातील निवासी आहेत. ते नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्या चराईसाठी कुंड्रा शिवारातील जंगलात गेले होते. त्यांचेवर रानडुकराने अचानक हल्ला चढवला. यावेळी त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली. घडलेल्या प्रकरणे ते कमालीचे घाबरले.

हल्ला होताच आडे यांनी आरडाओरड केली, त्याचवेळी शिवारातील काही मजूर धावत घटनास्थळी पोहचले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शेत शिवारात वन्य प्राण्यांचा वाढलेला वावर शेतकरी, शेतमजुरासाठी डोकेदुखी ठरत असून वन विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी: बातमीदार