Home Breaking News वेषांतर करून मटका अड्डयावर छापा, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची दणदणीत कारवाई

वेषांतर करून मटका अड्डयावर छापा, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची दणदणीत कारवाई

21 व्यक्ती ताब्यात, मालकावर गुन्हा नोंद

वणी: जिल्हा पोलीस अधीक्षक यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सायबर सेलच्या पथकाने शहानिशा करत वेषांतर करून मटका अड्डयावर छापा टाकला. याप्रसंगी 21 व्यक्तींना ताब्यात घेत मटका जंत्रीचे साहित्य, दुचाक्या, मोबाईल संच व रोकड असा 13 लाख 62 हजार 905 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवार दि. 5 मे ला रात्री उशिरा करण्यात आली.

आता ठाणेदारावर होणार का कारवाई
वणी परिसरात अवैद्य व्यवसाय जोमात सुरू असल्याचे या धाडसत्राने अधोरेखित झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने धाडसत्र अवलंबले होते. त्या कारवाई नंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर गंडांतर आले होते. तडकाफडकी कारवाया करण्यात आल्या होत्या. आता या दणकेबाज धाडसत्रा नंतर तशीच कारवाई अपेक्षित असल्याची चर्चा आज शहरात रंगताना दिसत आहे.

पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात अवैद्य धंदे आढळून आल्यास त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल अशी तंबी दिली होती. यामुळे काही प्रमाणात अवैद्य व्यवसायावर आळा बसला होता. अवैद्य धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता ठोस निर्णय घ्यावा असे आदेशात केल्यानंतर अवैद्य व्यावसायिकांनी आपले बिऱ्हाड लगतच्या जिल्ह्यात हलवले होते.

मिनाज ग्यासुद्दीन शेख यांनी आपल्या मटका अड्डयाची जंत्री नांदेपेरा मार्गावरील नवकारा नगरातील नव्यानेच होत असलेल्या बांधकामस्थळी हलवल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने प्रथम वेषांतर करून परिसराची झाडाझडती घेतली आणि छापा टाकला असता घटनास्थळावर 21 व्यक्ती उतारवाडी करत असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी 17 दुचाकी, तीन लॅपटॉप, चार प्रिंटर, 53 मोबाईल संच व 69 हजार 590 रुपये रोकड जप्त करण्यात आले.

Img 20250103 Wa0009

यावेळी विशाल पिसे (43)रा. साईदरबार प्रगती नगर, फरदीन अंतिक अहेमद (21) रा. रंगनाथ नगर, अनिकेत काकडे (22) रा. रंगनाथ नगर, मोहन काकडे (23) रा. रंगनाथ नगर, ज्ञानदेव बावणे (23) रा. विठ्ठलवाडी, संजय दुमणे (37) रा. जैताई नगर, राजेश शिवरात्रोवार (51) रामपुरा वार्ड, शेख साजिद शेख साबिर (32) शास्त्री नगर, शेख युनुस शेख मुनाफ (33) तेली फैल, अनिल लोणारे (48) आंबेडकर चौक, मुजिबुर हबिबुर रहेमान शेख (38) गणेश सोसायटी, रउफ हबिबुर रहेमान शेख (40) गुरु नगर, प्रणाल पारखी (28) सुभाषचंद्र बोस चौक, गजानन चित्तलवार (52) देरकर लेआउट, दिपक पचारे (54), रा. भोईपुरा, महेश टिपले (47) महात्माफुले चौक, दिलावर अकबर शेख (42) एकता नगर, अतिक फहिम अहेमद (45) घुग्गुस रोड, सुरज सातपुते (27) सम्राट अशोक नगर, सईद साबिर सईद सलाउद्दीन (29) रामुपूरा वार्ड, गौरव नागपुरे (22) एकता नगर यांना ताब्यात घेण्यात आले तर मिनाज शेख यांचेवर भा.द.वी. 109 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अमोल पुरी, सपोनी सांरंग बोम्पीलवार, सपोनी प्रकाश पाटील, सपोनी विकास मुंढे, पोलीस अंमलदार गजानन डोंगरे, विशाल भगत, कविष पाळेकर, पंकज गिरी, अजय निर्वाळकर, इफ्राज काझी, विजय मलमकार, देवेन्द्र गोडे, प्रविण कुथे सर्व पोलीस अधिक्षक कार्यालय, यवतमाळ यांनी पार पाडली.
वणी बातमीदार