● कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांची व्यथा
सुनील पाटील | शासनाने दोनवेळा कर्जमाफी देवून खात्यात पैसे न आल्याने व्यथित झालेल्या शेतकऱ्याने चक्क आपल्या रक्तानेच मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. पत्र लिहताना रक्त गोठत असल्याची दाहकता नमूद करत शासनाला केलेले आर्जव, मन हेलवणारे आहे. वंचित शेतकऱ्यांची व्यथा शासन दरबारी पोहचवण्याचा प्रयत्न यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथील शेतकऱ्यांने केला.

सुरेश बोंबलगे असे शेतकऱ्याचे नाव आहे, त्यांनी आपल्या शरीरातील रक्ताने महाराष्ट्राचे (CM) मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. सातत्याने वाढणारा कर्जाचा डोंगर, अस्मानी संकट आणि पारंपरिक पिकांचा अल्प हमीभाव यामुळे शेतकरी संपुष्टात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
तत्कालीन सरकारने 2017 मध्ये कर्जमाफी केली, बहुतांश शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली मात्र शेकडो शेतकरी वंचित राहिल्याचे बोंबलगे यांनी स्पष्ट केले. तसेच 2019 मध्ये देण्यात आलेल्या कर्जमाफीत तत्पूर्वी वंचित राहिलेला शेतकरी पात्र ठरला नाही.
छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने देण्यात आलेल्या कर्जमाफीत वंचित असलेल्यांना न्याय कोण देणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्या दोन्ही महापुरुषांना स्मरण करून उचित न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
वणी: बातमीदार