Home Breaking News शनिवारी भव्य सत्कार सोहळा व जाहीर व्याख्यान

शनिवारी भव्य सत्कार सोहळा व जाहीर व्याख्यान

जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आयोजन

रोखठोक | OBC (VJNT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार सोहळा व जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 4 मार्चला वसंत जिनिंग लॉन येथे सायंकाळी 6:30 वाजता भव्यदिव्य कार्यक्रम पार पडणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. वामनराव चटप हे असतील तर उद्घाटक म्हणून खा. बाळू धानोरकर यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे हे असतील.

आयोजित कार्यक्रमातील सत्कारमूर्ती माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र चोपणे, नवनिर्वाचित विधानपरिषद आ. सुधाकर अडबाले, आ. धीरज लिंगाडे व आ. अभिजित वंजारी हे असतील.

Img 20250103 Wa0009

जातनिहाय जनगणना आणि OBC (VJNT, SBC) आंदोलनाची भूमिका.” या विषयावर प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचे व्याख्यान होणार आहे. ते आपले परखड मत यावेळी मांडणार आहे.

आयोजित समारंभाकरिता प्रमुख अतिथी म्हणून आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.सुभाष घोटे, आ. प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी आमदार संजय धोटे, राष्ट्रीय समन्वयक राष्ट्रीय ओबीसी महासंघ अशोक जिवतोडे, जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष प्रदिप बोनगिरवार यांची उपस्थिती असणार आहे.

“जय ओबीसी, जय संविधान” व “एकच मिशन, जुनी पेन्शन” अशा घोषवाक्याखाली समस्त ओबीसी समाजबांधवानी, जुनी पेन्शन संघटनेच्या सदस्यांनी आणि वणी- मारेगाव – झरी तालुक्यातील नागरिकांनी मोठा संख्येनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
वणी : बातमीदार