● डोर्ली शिवारात विविध चर्चेला उधाण
ज्योतिबा पोटे- मारेगाव : तालुक्यातील डोर्ली येथे वास्तव्यास असलेला 50 वर्षीय शेतकरी रविवार दि.8 मे ला नेहमीप्रमाणे शेतात जागलीला गेला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेहच आढळल्याने परिसरात कमालीची खळबळ माजली आहे.

विलास कर्णुजी गोहोकार (50) असे मृतकाचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे शेतमालाची राखण करण्यासाठी रविवारी रात्री शेतात जागलीला गेले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचा भाऊ शेतात गेला असता मृतदेह संशयास्पद अवस्थेत दिसून आला तसेच त्यांच्या शरीरावर जखमांचे व्रण आढळून आले.
घटनेची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली, पोलिसांना सूचित करण्यात आले. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून नेमका मृत्यू कशाने झाला याबाबत उलगडा होणार आहे. मात्र त्यांच्या संशयास्पद मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
मारेगाव: बातमीदार