Home Breaking News शेतपिकांना आधारभूत किंमतीच्या दीडपट भाव द्या..!

शेतपिकांना आधारभूत किंमतीच्या दीडपट भाव द्या..!

● कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

640
Img 20240104 Wa0011

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

Wani News :- शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन येथील काँग्रेस कमिटीने वणी दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. A statement was given to Agriculture Minister Dhananjay Munde who came on Wani tour.

Img 20250422 wa0027

राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बुधवार दिनांक 3 जानेवारीला चंद्रपूर येथिल कृषी प्रदर्शनाच्या आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. परतीच्या प्रवासात त्याचे निकटवर्तीय असलेले डॉ महेंद्र लोढा यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली.

Img 20250103 Wa0009

यावेळी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम पावडे, राकेश खुराणा, जय आबड, जयसिंग गोहोकार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा, पुरबुडी, ओल्या दुष्काळा मुळे नष्ट झालेल्या पिकाची नुकसानभरपाई मिळण्यात यावी,

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता दिवसाला रोज 10 तास वीज मिळावी, कापसाला 12 हजार रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन ला 8 हजार, तुरीला 13 हजार रुपये आधारभूत किंमतीच्या दीडपट भाव देण्यात यावा तसेच जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता तारकुंपणाला सरसकट अनुदान देण्यात यावे या मागणीचे निवेदन सादर केले.
Rokhthok News

Previous articleनववर्षालाच चोरट्यांची पोलिसांना सलामी
Next articleबायपास वर भीषण अपघात, महिला ठार
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.