Home Breaking News संस्थेप्रति निष्ठा आणि उन्नतीचा ध्यास असेल तरच मिळतो “विजय”

संस्थेप्रति निष्ठा आणि उन्नतीचा ध्यास असेल तरच मिळतो “विजय”

728

सभासदांच्या घरापर्यंत ‘जय सहकार’

रोखठोक | वसंत जिनिंगच्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. सर्वच पॅनल कसोशीने रणसंग्रामात उतरले आहेत. संस्थेचे प्रगतीपुस्तक घेवून सहकार पॅनल सभासदांच्या घरापर्यंत पोहचत आहेत. संस्थेप्रति निष्ठा आणि उन्नतीचा ध्यास हा एकमेव मंत्र सहकार चा “विजय” निश्चित करण्यास पुरेसा आहे.

Img 20250422 wa0027

वणी विधानसभा क्षेत्रातील सहकार क्षेत्रात ऍड. देविदास काळे यांनी चांगले प्रभुत्व निर्माण केले आहे. ताब्यातील संस्थांचा कायापालट करण्यात आल्याचे वास्तव नाकारता येत नाही. वसंत जिनिंगचे कार्यक्षेत्र वणी, मारेगाव, झरी या तिन तालुक्यात आहे. मुकूटबन, मारेगाव, मार्डी, शिंदोला, वणी येथे जिनींग आहे. सोबतच शहरात शेतकरी मंदीर, लाॅन च्या माध्यमातुन संस्थेने आर्थीक स्त्रोत निर्माण केले आहे.

Img 20250103 Wa0009

शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता व खंदे संचालक सोबत असल्यानेच ऍड. देविदास काळे यांच्या अधिपत्यातील सहकारी संस्थांनी गरुडझेप घेतल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सहकारी संस्थांची वाट लावणारे सुद्धा वणीकर नागरिकांनी अनुभवले आहे.

मातेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात
विजयबाबू चोरडिया हे जय सहकार पॅनलच्या माध्यमातून वसंत जिनिंग च्या निवडणूक रणसंग्रामात उतरले आहे. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसमावेशक उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. संचालक पदाकरिता निवडणूक लढवत आहेत. तर ऍड. देविदास काळे यांच्या सह सर्व उमेदवारांनी तालुक्यातील वनोजादेवी येथील जागृत माता मंदिरातील मातेचे दर्शन घेवून प्रचाराला सुरुवात केली आहे.

ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल मधील उमेदवार विजयबाबू चोरडीया, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, पुंडलिक भोंगळे, संजय पारखी, लुकेश्वर बोबडे, मोहन जोगी, अमोल ठाकरे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई, नामदेव सुरपाम हे गटा-गटाने सभासदांच्या भेटीगाठी घेत असून नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत आहेत
वणी: बातमीदार