Home Breaking News सुरक्षा सप्ताहाच्या पूर्वसंध्येला कोळसा खाणीत अपघात, दोन अधिकारी जखमी

सुरक्षा सप्ताहाच्या पूर्वसंध्येला कोळसा खाणीत अपघात, दोन अधिकारी जखमी

2754

जुनाड कोळसा खाणीत घडली घटना

रोखठोक | वणी  क्षेत्रातील जुनाड ओपन कास्ट कोळसा खाणीत अधिकाऱ्यांच्या वाहनावर डोझर आदळले. या भीषण अपघातात दोन अधिकारी गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारार्थ नागपूर ला हलविण्यात आले आहे. ही घटना गुरुवार दि. 8 डिसेंबरला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली.

Img 20250422 wa0027

सुरक्षा सप्ताह नावापुरताच
वेकोली आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष देते. त्या करिता वर्षातून एकदा सुरक्षा सप्ताह मोठया धडाक्यात प्रत्येक कोळसा खाणीत साजरा केल्या जातो. याकरिता लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याजातो. मात्र सुरक्षा सप्ताहाच्या पूर्वसंध्येलाच कोळसा खाणीत झालेल्या अपघाताने वेकोली प्रशासनाचे पितळ उघडे पडले असून हा सुरक्षा सप्ताहाचा निव्वळ देखावा म्हणणे वावगे ठरणार नाही.

Img 20250103 Wa0009

एरिया सेफ्टी ऑफिसर चंद्रकांत वालदे व अंडर मॅनेजर मनीष चावरे हे म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी कोळसा खाणीत सुरक्षा सप्ताह असल्यामुळे पूर्वसंध्येला ते पाहणी करत होते. तर टाटा सुमो हे वाहन चावरे स्वतः चालवत होते.

जुनाड ओपन कास्ट कोळसा खाणीत लेव्हलिंगचे काम सुरू होते तर ब्लास्टिंग सुध्दा होत होती. यामुळे डोझर ला बाहेर जाण्यास सांगितले. डोझर चालक चढावरून डोझर चालवत असताना अकस्मात भरधाव मागे आले. पाठीमागे अधिकाऱ्यांचे वाहन होते, डोझर रिव्हर्स आले आणि भीषण अपघात घडला.

या अपघातात अधिकाऱ्यांचे वाहन चक्काचूर झाले, अपघात भीषण होता. घटना घडताच प्रत्यक्षदर्शींनी जखमींना तातडीने भालर येथील वेकोलीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ नागपूर ला हलविण्यात आले आहे.

वणी : बातमीदार