● कोविड संसर्गाचा ग्राफ वाढतोय
वणी: राज्यात कोरोनाचा ग्राफ वाढत असतानाच जिल्हा तसेच तालुक्यात कोरोना बाधित निष्पन्न होताहेत. मंगळवारी तालुक्यातील दोन महिला बाधित निघाल्या होत्या तर गुरुवारी प्राप्त अहवालानुसार 1 व्यक्ती कोरोना बाधित आढळला आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 34 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 67 व बाहेर जिल्ह्यात 10 अशी एकूण 77 झाली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरताच नागरिक बिनधास्त झाले होते. कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे पूर्णतः विसरल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य झाले आहे.
नवं वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. शासनस्तरावरुन कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता बळावली आहे. सण उत्सव आणि बाजारपेठेतील वाढती गर्दी कोरोनाच्या प्रसाराला मदत करणारी ठरत आहे.
मुकूटबन येथील एका व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांनी वणीत कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्यात आज तब्बल 34 रुग्ण आढळलेत. सतत निष्पन्न होत असलेल्या बाधित रुग्णामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
वणी: बातमीदार