Home Breaking News बापरे….निलजई खाणीत मातीचा डोंगर कोसळला, चार तरुण थोडक्यात बचावले

बापरे….निलजई खाणीत मातीचा डोंगर कोसळला, चार तरुण थोडक्यात बचावले

● WCL च्या निष्काळजीपणाचा कळस, मातीच्या ढिगाऱ्याखाली ट्रक व स्कॉर्पिओ गाडल्या गेली..!

C1 20250902 21543522
Img 20250910 wa0005

WCL च्या निष्काळजीपणाचा कळस, मातीच्या ढिगाऱ्याखाली ट्रक व स्कॉर्पिओ गाडल्या गेली..!

Wani News :
मुसळधार पावसाने सोमवारी संध्याकाळी निलजाई खाण परिसरात अक्षरशः मृत्यूचा सापळा निर्माण झाला. WCL च्या बेफिकीरीमुळे उकणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतचा ओबी (ओव्हर बर्डन) डोंगर अचानक कोसळला. क्षणात रस्ता गिळून टाकणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली ट्रक व स्कॉर्पिओ गाडली गेली. चार तरुण थोडक्यात बचावले. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी वेकोलीच्या कार्यपद्धतीचा अनुभव मात्र सर्वसामान्यांनी अनुभवला आहे. A mountain of soil collapsed in Niljai mine, four youths narrowly escaped

Img 20250103 Wa0009

घटना घडताच स्कॉर्पिओमध्ये बसलेले चार तरुण मागच्या दारातून कसाबसा बाहेर पडले, अन्यथा त्यांचा निश्चितच मृत्यू ओढवला असता. वाहन मात्र पूर्णपणे मातीखाली गाडले गेले. अडकलेला ट्रक वंदना ट्रान्सपोर्टचा असून तोही प्रचंड मलब्याखाली पुरला गेला आहे. या घटनेमुळे वेकोलीची कार्यप्रणाली चव्हाट्यावर आली आहे.

अपघातानंतर निलजई-घुग्घुस मार्ग पूर्ण बंद झाला. दुसऱ्या शिफ्टमधील शेकडो WCL कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणीतून दुसऱ्या मार्गाने घरी रवाना करण्यात आले. जीव धोक्यात घालून रोज या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत WCL व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा प्रामुख्याने दिसून येत आहे.

● युद्धपातळीवर मदतकार्य, पण …!
जड यंत्रसामग्रीने मलबा हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. अपघात टाळण्यासाठी पूर्वतयारी का नाही? रोज हजारो जणांचा जीव धोक्यात घालणाऱ्या WCL व्यवस्थापनावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ROKHTHOK