Home Breaking News नऊ वर्षीय बालकाचा पहिला रोजा पूर्ण

नऊ वर्षीय बालकाचा पहिला रोजा पूर्ण

● मो. अली वर अभिनंदनाचा वर्षाव

C1 20240315 07334038

मो. अली वर अभिनंदनाचा वर्षाव

Wani News | काळे ले आऊट नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या मो. अली मोहम्मद इक्बाल शेख या नऊ वर्षांच्या चिमुरड्याने पवित्र रमजानचा पहिला रोजा पुर्ण केला. याबद्दल मो. अली चे मुस्लिम बांधवांनी अभिनंदन केले. Muslim brothers congratulated Mohamad Ali.

इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात. मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात.

मो. अलीने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो सकाळी पाच वाजता पासून सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी मो. अली ला नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन त्याने उपवास सोडला. मो.अली हा येथील पत्रकार इक्बाल शेख यांचा मुलगा आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009