● उत्पादन शुल्क चे अधिकारी नामधारी
Excise duty news | वणी उपविभागात मदिरालयाचे चांगलेच प्राबल्य आहे. ठिक ठिकाणी दारुची दुकाने थाटण्यात आलेली आहे. जिल्ह्यात सर्वाधीक बिअर बार असणारं शहर म्हणुन वणीची नव्यानेच ओळख निर्माण झाली आहे. माञ नियमांना तिलांजली देत पहाटे चहाच्या पुर्वीच दारुचा घोट मिळत असल्याने मद्यपीची चांगलीच चंगळ होत आहे. By flouting the rules and getting a sip of alcohol before tea in the morning…
उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नसल्याचे वास्तव अधोरेखित होत आहे. दारु दुकान उघडणे व बंद करण्याचे नियम शासनाने निर्धारीत केले आहे. त्या नियमांचे पालन होते की नाही हे तपासण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागावर आहे.
वणी उपविभाग औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला आहे, येथे कामगार, रोजमजुर यांची संख्या लक्षणीय आहे. “दारु साठी काय पण” अशी अवस्था अनेकांची झाली आहे. काही मद्यपी पहाटे दारुची दुकाने उघडण्याची चातकाप्रमाणे वाट पहात असतात. याचे ज्वलंत उदाहरण जुने बसस्थानक परिसर, शाम टॉकीज, नांदेपेरा मार्ग येथे बघायला मिळेल.
वणी शहरात देशी विदेशी दारुचा महापुर वाहतोय तो सुद्धा पहाटे पासुन मध्यराञ उलटल्या नंतरही. अनेक बिअर बार भल्या पहाटे ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज असतात माञ उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी साधी कारवाई करण्यास धजावत नाही. लिकर लॉबीच्या पुढे अधिकाऱ्यांची बोलती बंद का होते हा संशोधनाचा विषय आहे.
● मद्यपी मद्य परवाना बाळगतो का ●
कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार शहरात सुरू आहे. परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा विक्रेत्याला किंवा बारचालकाला घसघशीत दंड होऊ शकतो, परंतु, परवाना नसतानाही दारू पिणाऱ्यांना सर्रास दारूची विक्री केली जाते. ग्राहकाकडे परवाना आहे की नाही, हे पाहण्याची तसदी घेतल्या जात नाही. तसेच अशा स्वरुपांची कारवाई झाल्याचे आज पर्यंत ऐकीवात नाही.
ROKHTHOK NEWS






