Home Breaking News भरधाव कारची दुचाकीला धडक, एक ठार

भरधाव कारची दुचाकीला धडक, एक ठार

● भीषण अपघातात एक ठार दुसरा गंभीर जखमी

C1 20240626 15525842

भीषण अपघातात एक ठार दुसरा गंभीर 

Accident News | शहरातील बाजार समिती समोर भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघात दुचाकीवरील एक तरुण मृत्युमुखी पडला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवार दिनांक 26 जूनला दुपारी घडली. A speeding car hit a two-wheeler in front of the market committee in the city.

शुभम सुशीलकुमार राय (38) असे मृतकाचे नाव आहे तो दाताळा येथील निवासी होता. तर जखमींचे नाव कळू शकले नाही. भरधाव वाहने चालविण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शहरातील वरोरा मार्गावर बाजार समिती जवळ वरोऱ्याकडे जात असलेल्या भरधाव कार ने चंद्रपूर ला जात असलेल्या दुचाकीला उडवले. अपघात होताच कार चालकाने पळ काढला.

जखमी अवस्थेत दुचाकीस्वार पडून होते. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवले त्यातील शुभम ला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर जखमींवर उपचार सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस पुढील तपास करताहेत.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009