Home Breaking News कायदा व सुव्यवस्थेला आधुनिकता आणि पारदर्शकतेचा स्पर्श

कायदा व सुव्यवस्थेला आधुनिकता आणि पारदर्शकतेचा स्पर्श

● sdpo कार्यालय ठरले परिक्षेत्रात अव्वल

404
C1 20250518 11170844

sdpo कार्यालय ठरले परिक्षेत्रात अव्वल

Wani News | राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आधुनिकतेचा आणि पारदर्शकतेचा स्पर्श देण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वणी येथे राबविण्यात आलेली 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम अत्यंत यशस्वी ठरली आहे. या कालावधीत गुन्हे तपास, नागरी सेवा, कार्यालयीन स्वच्छता, तंत्रज्ञानाचा वापर आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना यामध्ये उल्लेखनीय प्रगती झाल्यानेच sdpo कार्यालय परिक्षेत्रात अव्वल ठरले. A touch of modernity and transparency to law and order.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम राबविण्याचे आवाहन राज्यातील सर्वच शासकीय विभागाला केले होते. 100 दिवसात कायदा-सुव्यवस्था, नागरी सेवा, गुन्हे प्रतिबंधक उपाय, व कार्यालयीन व्यवस्थापनात काटेकोर सुधारणा करण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Img 20250103 Wa0009

वणी उपविभागीय पोलीस कार्यालयाने राबविलेल्या 100 दिवसांच्या सुधारणा मोहीमेत विशेषत्वाने कायदा-सुव्यवस्था, नागरी सेवा, गुन्हे प्रतिबंधक उपाय, व कार्यालयीन व्यवस्थापन याकडे लक्ष दिले. यामुळे दखलपात्र बदल बघता फेब्रुवारी ते एप्रिल 2025 दरम्यान डायल 112 वरून दाखल झालेल्या घटनांवर सरासरी 6 मिनिटांत पोलीस पोहोचले. वणी पोलीस स्टेशनने सर्वाधिक 517 घटनांवर प्रतिसाद दिला. 2 हजार 121 मुद्देमालापैकी 57.14% मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार वितरित करण्यात आले.

गुन्हेगारी नियंत्रणासाठी सीसीटीव्हीचा प्रभावी वापर झाला असून 1 हजार 441 पैकी 1 हजार 205 गुन्ह्यांत कार्यवाही झाली. कार्यालयीन डिजिटायझेशन, स्वच्छता, व सौंदर्यीकरणामुळे नागरी सुविधा अधिक सक्षम बनल्या. QR कोडद्वारे मुद्देमाल ट्रॅकिंग व पोलीसांसाठी व्हॉलीबॉल मैदान, व्यायामशाळा हे उपक्रम उल्लेखनीय ठरले.

अमरावती परिक्षेत्रात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वणी हे प्रथम क्रमांक पटकावत अव्वल ठरले. या यशाचे श्रेय SDPO गणेश किंद्रे यांच्यासह उपविभागतील सर्व प्रभारी ठाणेदार, दुय्यम अधिकारी व अंमलदार तसेच उपविभागीय कार्यालयातील psi अरुण नाकतोडे, प्रदीप ठाकरे, विजय वानखडे, इक्बाल शेख, उमा करलुके, वैशाली गाडेकर, अमोल नुनेरवार, अतुल पयघान, अशोक दरेकर यांना दिल्या जात आहे.
Rokhthok News