Home Breaking News “मोहित”चा नागपुरात अपघाती मृत्यू

“मोहित”चा नागपुरात अपघाती मृत्यू

● मारेगावात पसरली शोककळा

C1 20241205 13434685

मारेगावात पसरली शोककळा

Sad News | मन हेलावणारी घटना गुरुवारी मध्यरात्री नागपुरात घडली. मारेगावात वास्तव्यास असलेला 23 वर्षीय तरुण मावस बहिणीच्या लग्नकार्याला नागपूरला गेला होता. हळदीचा कार्यक्रम आटोपून तो दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. An unknown vehicle hit the bike hard

मोहीत उर्फ ओम बंडू उज्वलकर (23) असे मृतकाचे नाव आहे. तो मारेगाव येथील निवासी आहे. त्याच्या मावस बहिणीचे लग्न असल्याने हळदीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने दिघोरी रोडला असलेल्या नातेवाईकांकडे आराम करण्यासाठी जात होता. तेवढ्यात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात त्याचे डोक्याला गंभीर इजा झाली अति रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

मोहीत याचे वडील अर्धांगवायू आजाराने पिडीत आहे. कुटुंबाचा आधारवड असलेला मोहीत हा मारेगाव स्थित चहाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. अशातच मनसुन्न करून टाकणाऱ्या मोहीतच्या दुर्देवी मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. मोहीत याच्या पश्चात आई, वडील व लहान बहीण आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009