Home Breaking News अखेर “त्या” आरोपीला मध्यप्रदेशातून “अटक”

अखेर “त्या” आरोपीला मध्यप्रदेशातून “अटक”

● पोलिसांच्या तपास यंत्रणेला यश

C1 20231014 11040683

पोलिसांच्या तपास यंत्रणेला यश

Wani News | स्‍थावर मालमत्‍तेचा वाद विकोपाला गेला होता, ताबा मिळवण्यासाठी आरोपीने चक्क जेसीबी मशीनच्या साह्याने दुकान जमीनदोस्त केले. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच मुख्य आरोपी फरार झाला होता. पोलिसांच्या तपास यंत्रणेने तांत्रिक बाबीचा अवलंब करून आरोपी समीर रंगरेज याला मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथून शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. The investigation system of the police adopted the technical matter and detained the accused Sameer Rangrej

टिळक चौक परिसरात पंकज भंडारी यांच्या मालकीचे नवकार फर्निचर नामक दुकान आहे आणि त्यांचा ताबा त्याजागेवर आहे. मात्र त्या जागेचा ताबा मिळावा याकरिता समीर रंगरेज याने कायदा हातात घेतला. अंधाऱ्या राञी जेसीबी मशिनच्‍या साह्याने दुकानाची प्रचंड नासधूस करण्‍यात आली. यात तब्बल 18 लाख रुपयांचे नुकसान झाले तर एक लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली.

वणीचे ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने गुन्हा दाखल केला. पोलीसांनी तपासाची चक्रे हालवून घटनास्‍थळी वापरण्‍यात आलेले जेसीबी मशिन व दोन ऑपरेटर यांना ताब्‍यात घेतले होते मात्र या प्रकरणातील मुख्‍य आरोपी माञ पसार झाला होता.

Img 20250103 Wa0009

पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत आरोपीचा ठावठिकाणा हुडकून काढला. आरोपी मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे असल्याचे स्पष्ट होताच पोलीस उप निरीक्षक सुदाम आसोरे, विकास धडसे, सागर सिडाम, शुभम सोनूले, वसीम यांनी शुक्रवारी रात्री समीर रंगरेज याला ताब्यात घेतले. यामुळे घडलेल्या घटनेतील गुंता सोडवणे आता शक्य होणार आहे.
Rokhthok News