● त्या.. प्रकरणातील गुन्ह्यात वाढ करा
Wani News | शहरात शनिवारी दिपक चौपाटी परिसरात गोवंशाचे दोन मुंडके आढळुन आले होते. तर मोठया प्रमाणात गोवंशाची हाडे व मांस मिळुन आल्यानंतर पोलीसांनी गुन्हा नोंद करत आठ आरोपींना ताब्यात घेतले तर काही फरार झाले होते. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने जामीन दिला आहे. थातुर मातुर गुन्ह्याची नोंद केल्यानेच आरोपींची सुटका झाल्याचा सुर आवळत भाजपा नेत्यांसह हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुन्ह्यात वाढ करावी ही मागणी करत दोन तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. Activists of Hindu organizations along with BJP leaders demanded an increase in cases

शनिवारी सायंकाळी दिपक चौपाटी परिसरातील एका रस्त्यावर दोन गोवंशाचे धडावेगळे मुंडके आढळुन आले होते. या घटनेमुळे कमालीची खळबळ उडाली होती. राम नवमी समितीचे कार्यकर्ते, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, बजरंग दलाचे कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले होते. त्यांनी परिसराची पाहणी केली असता हाडा मासांचा मोठा साठा आढळुन आला होता. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
पोलीसांनी घटनेचे गांभीर्य बघता तातडीने गुन्हा नोंद करुन आठ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले तर अनेकांवर गुन्हा दाखल करुन तपासात घेतला. या घटनेत जाहीर अली मुबारक अली (40), मो. तौशीफ रहीश कुरेशी (34), सैयद जलील सैयद कादर (49), शेख सगीर शेख इब्राहीम (30), शाकीर खान समशेर खान (27), मो. अनिस अब्दुल रशीद (50), इरफान खान शहाबाज खान (35), तसलीम खान वहाब खान (44) यांना ताब्यात घेतले तर अन्य आरोपी फरार आहेत. यांचेवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली होती.
सोमवारी सायंकाळी भाजपाचे नेते माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रवी बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, कुनाल चोरडीया, श्रीकांत पोटदुखे, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे अजिंक्य शेंडे, राजु तुराणकर, बंटी ठाकुर,बजरंग दलाचे कार्यकर्ते, हिंदु संघटनाचे शेकडो कार्यकर्ते यांनी पोलीस ठाणे गाठले. उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहरानी यांना निवेदन देत गुन्ह्यात वाढ करण्याची मागणी केली आणि तब्बल दोन तास ठिय्या दिला. याप्रकरणी योग्य पध्दतीने तपास करुन गुन्हयात वाढ करण्यात येईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची सांगता केली.
Rokhthok News






