● पार्श्वभूमी लोकसभा निवडणुकीची
● API चाटसे पांढरकवडा तर PSI कंदुरे LCB
Police News : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विहित निकषानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असे पोलीस महा संचालक यांना सुचवले होते. त्यानुसार वणी येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची अमरावती परिक्षेत्रातील अकोला येथे तर सपोनि माया चाटसे यांची पांढरकवडा व psi रामेश्वर कंदुरे यांची स्थानिक गुन्हे शाखा येथे बदली झाली आहे. police inspector Ajit Jadhav has been transferred to Akola API Maya Chatse has been transferred to Pandharakwada and psi Rameshwar Kandure to local crime branch.

मुळ जिल्हयात कार्यरत असणारे पोलीस अधिकारी तसेच दिनांक 30 जून 2024 पर्यंत जिल्हयात तीन वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण करणारे पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्याचे प्रस्तावित आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उप विभागातील पोलीस उप निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या होणार आहेत.
सहा महिन्या पूर्वी वणी पोलीस ठाण्यात रुजू झालेले ठाणेदार अजित जाधव यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला येथे बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागेवर कोणाची लॉटरी लागेल याची उत्सुकता लागली आहे.
अजित जाधव हे मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांची सहा महिन्या पूर्वी प्रशासकीय बदली वणी येथे करण्यात आली होती. मनमिळाऊ स्वभावाचे अजित जाधव यांनी वणी पोलीस ठाण्याचा कारभार उत्तमरीत्या सांभाळला.
दोन महिन्यावर लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे ज्या पोलीस अधिकाऱ्याला जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झाले अशा अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ही बदली करण्यात आली आहे. आता वणी ठाण्यात कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rokhthok News