● अवैद्य व्यवसायावर आळा बसवा
Wani News | उप विभागातील पाचही पोलीस स्टेशन अतिशय महत्वाचे आहेत. त्यातील वणी, शिरपुर आणि मारेगांव हे “मलाईदार” ठाणे म्हणुन जिल्ह्यात ओळखल्या जाते. दोन दिवसांपुर्वी मारेगांवात चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला याबाबत आढावा घेण्यासाठी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी धडक दिली असता संपुर्ण अवैद्य धंदे बंद करावे असे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांना ठणकावले. Two days ago, the thieves made a lot of noise in Maregaon

मारेगांव तालुक्यात अवैद्य धंद्यांनी चांगलेच थैमान घातले आहे. ठिक ठिकाणी चालणारे अवैद्य व्यवसाय यात प्रामुख्याने मटका, जुगार, कोंबड बाजार, अवैध दारू विक्री, गोवंश तस्करी याचा समावेश आहे. पोलीस प्रशासन यावर आळा घालण्यासाठी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
आमदार बोदकुरवार यांनी थेट मारेगाव पोलीस ठाणे गाठून ठाणेदार खंडेराव यांना विविध सूचना केल्या. तालुक्यात सुरू असलेले सर्व अवैद्य धंदे बंद करावे असे सुचित केले. तर दोन ते तीन दिवसात सर्व अवैद्य धंदे बंद करण्याचे आश्वासन ठाणेदारांनी दिल्यामुळे अवैद्य व्यवसाय सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.
दोन दिवसांपुर्वी मारेगांवात 14 ते 17 घरे चोरट्यांनी फोडली होती. अनेक घरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला यामुळे मारेगांवकर नागरीक भयभीत झाले होते. याबाबत आमदार बोदकुरवार यांनी ठाणेदारांना धारेवर धरत ताबडतोब चोरट्यांच्या मुसक्या आवळा, तपास यंञणा कार्यान्वित करा अशा सुचना दिल्यात.
याप्रसंगी दिनकर पावडे, भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शशीकांत आंबटकर, शहर युवामोर्चा अध्यक्ष अनुप महाकुलकर, शहर युवामोर्चा सरचिटणीस रविंद्र टोंगे, बाजार समिती संचालक अविनाश लांबट, नगर सेवक राहुल राठोड, नगर सेवक वैभव पवार, भाजपा युवामोर्चा महामंत्री विनोद ठावरी तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थीत होते.
Rokhthok News