Home Breaking News आणि…बोदकुरवार करणार आ. देरकरांना सहकार्य..!

आणि…बोदकुरवार करणार आ. देरकरांना सहकार्य..!

● मतदारसंघाच्‍या विकासासाठी प्रथम प्राधान्‍य ● निधीच्‍या उपलब्‍धतेकरीता कटिबद्ध

3524
C1 20241202 13184103

मतदारसंघाच्‍या विकासासाठी प्रथम प्राधान्‍य
निधीच्‍या उपलब्‍धतेकरीता कटिबद्ध

Political News | दहा वर्षाच्‍या कार्यकाळात “न भुतो न भविष्‍य ती” मतदारसंघातील विकास कामांकरीता निधीची उपलब्‍धता केली. आताही महायुतीचे सरकार येणार आहे. मतदारसंघाच्‍या विकासासाठी प्रथम प्राधान्‍य असेल असे बोदकुरवार म्‍हणाले. याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना विजयाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍यात. विकास कामांकरीता गरज भासल्यास शासनस्‍तरांवर निधीच्‍या उपलब्‍धते करीता सहकार्य करणार असल्‍याचे माजी आमदार बोदकुरवार यांनी पञपरिषदेतुन स्‍पष्‍ट केले. And… ex mla Bodkurwar, will Support to mla derkar

Img 20250422 wa0027

विधानसभेच्‍या निवडणुकीत जय पराजय ठरलेला असतो. पराभवाने खचुन न जाता नव्‍या जोमाने पक्षीय संघटनात्‍मक बांधणी करण्‍याचा मानस माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्‍यक्‍त केला. पक्षांतर्गत कुरघोडी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांने केलेले कृत्‍य व पसरविण्‍यात आलेल्‍या “जातीय फेक नरेटिव्‍ह” मुळे पराभव झाल्‍याचे बोदकुरवार यांनी मान्‍य केले.

Img 20250103 Wa0009

भाजपने दिल्‍लीतील संस्‍थे मार्फत केलेल्‍या अखेरच्‍या सर्व्‍हेक्षणात येथील महायुतीच्‍या उमेदवाराला 54 टक्‍के तर मविआच्‍या उमेदवाराला 35 टक्‍के मतदान होईल असे भा‍कीत केले होते. माञ 4 तारखेला घडलेल्‍या वादग्रस्‍त प्रकाराने संपुर्ण मतदारसंघातील चिञ बदलले. याघटनेशी कोणताही संबध नसतांना उमेदवार म्‍हणुन मला गोवण्‍यात आल्‍याची खंत बोदकुरवार यांनी व्‍यक्‍त केली. दहा वर्षाच्‍या कार्यकाळात जात, धर्म, पंथ यांचे बाबत कोणतेही भाष्‍य केले नाही, सर्व समाजाला सोबत घेत सर्वसमावेशक निर्णय घेतले. सामाजीक व्‍देश कधीच केला नाही, सर्वच समाजाच्‍या नागरीकांनी मला मतदान केले त्‍यांचा मी ऋणी असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले.

त्‍यांनी स्‍वतःच्‍या कामांचं श्रेय घ्‍यावं
वणी मतदारसंघात कोटयावधी रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे प्रस्‍तावीत असुन तांञीक बाबींची पुर्तता होताच सुरु होणार आहे. ही सर्व कामे महायुतीच्‍या कार्यकाळातील असुन त्‍याचे भुमिपुजन व लोकार्पण नवनिर्वाचित आमदारांनी करु नये अथवा श्रेय घेवू नये असा खोचक टोला याप्रसंगी माजी आमदार बोदकुरवार यांनी लावला. त्यांनी स्वतः खेचून आणलेल्या निधीतून केलेल्या विकासकामांचे श्रेय घ्‍यावं असे बोदकुरवार म्हणाले.
Rokhthok News